९४ वर्षाच्या आजीने देशाला मिळवून दिले सुवर्ण व कास्य

0
193

पुणे, दि. ११ (पीसीबी) – ज्या वयात लोकांना सहसा नीट बसता येत नाही, त्या वयात त्यांनी परदेशात भारताच्या तिरंग्याची किंमत उंचावली आहे. त्या आहेत भगवानी देवी डागर, वय वर्ष केवळ ९४ . त्यांनी ज्येष्ठ नागरिक गटात १०० मीटर शर्यतीत सुवर्ण आणि त्यानंतर शॉटपुटमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. सध्या देशात त्यांचीच चर्चा होते आहे.

९४ वर्षीय भगवानी देवी डागर यांनी काल फिनलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ मध्ये भारतासाठी एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत.

ज्या वयात लोकांना सहसा नीट बसता येत नाही, त्या वयात त्यांनी परदेशात भारताच्या तिरंग्याची शान उंचावली आहे. भगवान देवीने ज्येष्ठ नागरिक गटात १०० मीटर शर्यतीत सुवर्ण आणि त्यानंतर शॉटपुटमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यांनी २४. ४४ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. यासोबतच शॉटपुटमध्येही कांस्यपदक पटकावले.