दि.03 (पीसीबी) – भारतमातेचे थोर सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांना अमरावतीकरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 24 तबलवादकांच्या सांघिक तबलावादनाचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रविवार 5 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहात या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावतीत अनेक नवोदितांवर तबला वादनाचा संस्कार करणारे, जाकिरभाईंचे अब्बा व गुरू उस्ताद अल्लारखा साहेब यांच्याकडे तबला शिक्षण घेतलेले जाकीरभाईंचे गुरुबंधू गुरुवर्य मुकुंदराव सराफ यांच्या संकल्पनेतून व त्यांच्याच दिग्दर्शनात विदर्भातील ख्यातनाम 24 कलावंत या कार्यक्रमात सांघिक कला सादर करणार आहेत. जाकीर हुसेन यांचा कलावंत म्हणून अमरावतीशी अनेकदा संपर्क आला व अमरावतीकर रसिकांनी जाकीर हुसेन यांच्यावर भरपूर प्रेम केले.
या कार्यक्रमात स्वतः मुकुंदराव सराफ यांच्यासह अक्षय ताम्हणकर, स्वरांग केतकर, राधेय इंगळे, वेदांत येते, समीर जगताप, आदित्य उपाध्याय, आदित्य बजाज, मंजिरी जगताप, प्रथमेश मोरे, प्रशांत दुधे, अनामय पवार, सोहम जगताप, राहुल बलखंडे, सिध्देश्वर टिकार, आराध्य गायकवाड, आदित्य पाचघरे, स्वप्निल सरदेशमुख, स्नेहित बंड, प्रसाद महाजन, शौर्य काळे, गजानन पळसकर – हार्मोनियम, श्रीकृष्ण जिरापुरे – हार्मोनियम प्रामुख्याने भाग घेणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. सौ. सुलभाताई खोडके, आ. राजेश वानखडे, जयंत डेहणकर, प्रा. दिनेश सूर्यवंशी, प्रा. रवींद्र खांडेकर, सौ. किरणताई महल्ले, डॉ. नितीन धांडे, नितीन गुडधे पाटील, चेतन पवार यांच्यासह विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रसिकांसाठी प्रवेश निःशुल्क आहे.
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केले आहे.