४९६ कोटींचा बँक गैरव्यवहार प्रकऱणात, अनिल भोसलेंचा जामीन चौथ्यांदा फेटाळला

0
220

पुणे, दि. २७ (पीसीबी) : शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी आमदार अनिल भोसले यांचा न्यायालयाने चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश आर.एन.हिवसे यांनी हा आदेश दिला.शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत ४९६ कोटी ४४ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात अनिल भोसले यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अनिल भोसले न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन मिळण्यासाठी भोसलेंनी आतापर्यंत चारवेळा अर्ज करण्यात आला. पण न्यायालयाने चौथ्यांदा त्यांचा अर्ज फेटाळून लावला.
न्यायालयात न्यायवैद्यक लेखा परीक्षा अहवाल म्हणजेच फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट दाखल झालाय. तसेच त्यांच्यावर असलेल्या देण्यापेक्षा जास्त रक्कम वसूली झाल्याने आता भोसले यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद भोसले यांच्या वकीलांनी केला.पण भोसलेंनी एकाच वेळी पुणे विशेष न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, पण त्यांनी याबाबतची माहिती लपवून न्यायालयाची फसवणूक केली. असा युक्तिवाद मूळ फिर्यादी व गुंतवणूकदारांच्या बाजूने वकील सागर कोठारी यांनी केला.

तसेच,फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टनुसार आमदार भोसले यांचे सामूहिकरीत्या ४९६ कोटी रुपयांपेक्षा जास्त देणे आहे. तसेच अद्याप त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांच्यासह इतर १२ जणांना अद्याप अटक झालेली नाही.असे सांगत अ‍ॅड. कोठारी यांनी त्यांना जामीन देण्यास आक्षेप घेतला.तर सरकारी पक्षाच्या वतीने विलास पठारे यांनी बाजू मांडली. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या बाजूने ऐकून घेतल्यानंतर न्यायाधिशांनी भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.