४२ दिवसांत तिसरा मृत्यू; एमपीच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून स्थलांतरित मादी चित्त्याचा मृत्यू

0
174

मध्यप्रदेश, दि. १० मे २०२३ (पीसीबी) – मध्य प्रदेश राज्यातील कूनो नॅशनल पार्कमध्ये परदेशातील आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. हा चित्ता आफ्रिकेतून कूनो येथे आणला गेला होता. तीन महिन्यात तीन चित्त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. मागच्या महिन्यात उदय या चित्त्याचा मृत्यू झाला होता. पहिला मृत्यू साशा या मादी चित्त्याचा झाला होता. तिला नामीबियाहून आणले होते. त्यानंतर आफ्रिकेतून आणलेल्या उदय चित्त्याचा मृत्यू झाला. दोघांचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नामीबियाहून आणलेल्या साशा या मादी चित्त्याचा मृत्यू मार्चमध्ये झाला होता. तर एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या उदय चित्त्याचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे मृत्यू होण्याच्या दोन दिवस आधीच त्याचे उदय असे नामकरण करण्यात आले होते. सांगितले गेले की,उदय रविवारी सकाळी ९ वाजता आजारी पडला त्यानंतर ११ वाजता त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले व त्यानंतर उपचारादरम्यान दुपारी चार वाजता त्याने अंतिम श्वास घेतला.

नामीबिया आणि दक्षिणआफ्रिकेतून कूनो नॅशनल पार्कमध्ये २० चित्ते आणले गेले होते. त्यापैकी आता १७ उरले आहेत. एप्रिल महिन्यात विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यानंतर आफ्रिकन चित्त्यांना जंगलात सोडण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेतून १८ फेब्रेवारी रोजी कूनो येथे आणल्या गेलेल्या १२ पैकी ३ नर चित्त्यांना १७ एप्रिल रोजी क्वारंटीन पिंजऱ्यातून मुक्त केले होते. तर १८ व १९ एप्रिल रोजी शिल्लक राहिलेल्या ९ चित्त्यांना जंगलात सोडले होते.