३६व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर

0
5

दि.०३(पीसीबी )-परभणी विरुद्ध बीड, पिंपरी-चिंचवड विरुद्ध रायगड, रत्नागिरी विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व या किशोर गटाच्या, तर नाशिक शहर विरुद्ध ठाणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड विरुद्ध नांदेड, परभणी विरुद्ध जळगांव या किशोरी गटाच्या सामन्यानी “३६व्या किशोर व किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी ” स्पर्धेला दि. ०५नोव्हे. पासून प्रारंभ होईल. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असो. च्या यजमान पदाखाली राकेशभाऊ घुले कबड्डी संघ यांच्या विद्यमाने पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची गटवारी राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबूराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमाकरिता जाहीर केली.

गतवर्षी मनमाड-नाशिक येथे झालेल्या या स्पर्धेत परभणीने किशोर सहज, तर यजमान नाशिक शहरने किशोरी गटात चूरशीची लढत देत विजेतेपद पटकाविले होते. पिंपरी-चिंचवड संघाला मात्र दोन्ही गटात उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले होते. यंदा सामने पुण्यातच असल्याने होत असल्याने पिंपरी-चिंचवड संघ या संधीचा कसा लाभ उठवितो हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल. स्पर्धेची गटवारी खालील प्रमाणे.

किशोर गट विभागणी:-

१)अ गट :- १)परभणी, २)जळगांव, ३)बीड.
२) ब गट :- १)पिंपरी-चिंचवड, २)पुणे शहर, ३)रायगड, ४)सोलापूर.
३) क गट :- १)रत्नागिरी, २)नांदेड, ३)मुंबई उपनगर पूर्व, ४)सिंधुदुर्ग.
४) ड गट :- १)जालना, २)पालघर, ३)नाशिक शहर, ४)हिंगोली.
५) इ गट :- १)ठाणे ग्रामीण, २)उस्मानाबाद, ३)नाशिक ग्रामीण, ४)सातारा.
६) फ गट :- १)कोल्हापूर, २)औरंगाबाद, ३)धुळे, ४)मुंबई शहर पूर्व.
७) ग गट :- १)मुंबई उपनगर पश्श्चिम, २)अहमदनगर, ३)लातूर, ४)ठाणे शहर.
८) ह गट :- १)नंदुरबार, २)सांगली, ३)मुंबई शहर पश्श्चिम, ४)पुणे ग्रामीण.

किशोरी गट विभागणी :-

१)अ गट :- १)नाशिक शहर, २)मुंबई उपनगर पश्श्चिम, ३)ठाणे ग्रामीण.
२) ब गट :- १)पिंपरी-चिंचवड, २)नंदुरबार, ३)नांदेड, ४)बीड.
३) क गट :- १)परभणी, २)रत्नागिरी, ३)जळगांव, ४)सोलापूर.
४) ड गट :- १)सांगली, २)ठाणे शहर, ३)सातारा, ४)औरंगाबाद.
५) इ गट :- १)पुणे ग्रामीण, २)अहमदनगर, ३)पालघर, ४)धुळे.
६)फ गट :- १)नाशिक ग्रामीण, २)कोल्हापूर, ३)लातूर, ४)हिंगोली.
७) ग गट :- १)जालना, २)पुणे शहर, ३)उस्मानाबाद, ४)सिंधुदुर्ग.
८) ह गट :- १)मुंबई उपनगर पूर्व, २)रायगड, ३)मुंबई शहर पश्श्चिम, ४)मुंबई शहर पूर्व.