३५ हजार सदनिकांच्या प्रकल्पात २० हजार कोटींच्या घोटाळ्याचं कारस्थान

0
200

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील सदनिका प्रकरण बाहेर काढलं आहे. ३५ हजार सदनिकांच्या प्रकल्पात २० हजार कोटींच्या घोटाळ्याचं कारस्थान रचल्यानं सांगत कोर्टात याचिका दाखल केल्याचं सोमय्यांनी स्पष्ट केलं.

किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे सरकारने मार्च २०२२ मध्ये मुंबईत ३५ हजार प्रकल्पग्रस्त सदनिका बनविण्यासाठी कंत्राट काढलं. शाहिद बलबा आणि अतुल चोरडिया या बिल्डरांना ६ कंत्राट दिले. त्यातला एक प्रकल्प मुलुंड पूर्व केळकर कॉलेज जवळ दुसरा कांजुरमार्ग इथे चांदणी बोरी इथे होणार होता. तर प्रभादेवी इथे आणि जुहू मालाड इथे असे प्लान होते. या प्रकल्पाच्या माध्यामातून बिल्डर लोकांनी २० हजार कोटी लुटण्याचं कारस्थान रचलं होतं.

याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात २० हजार कोटींचा घोटाळा म्हणून सोमय्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.सोमय्या पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलुंडचा प्रकल्प थांबवावा, उद्धव ठाकरे यांचे कटकारस्थान थांबवावे लागणार आहे. मी या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारलाही प्रतिवादी म्हणून नमूद केले आहे. सर्व घोटाळ्यांवर इक्बाल चहल यांच्या सह्या आहेत. SIT नेमून चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरून बाजूला करावे, अशी मागणी त्यांनी केली.