२ लाख ३२ हजार मालमत्तांचा जीआयएस सर्व्हे पूर्ण – आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

0
341

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे स्मार्ट सिटी अभियानांतर्गत जी.आय.एस. (भौगोलिक माहिती प्रणाली) सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. २ लाख ३२ हजार मालमत्तांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. जी.आय.एस.प्रणालीचा वापर करुन ३५ लोकोपयोगी सेवा पुरविणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

स्मार्ट सिटी प्रकल्प कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि.२९) शहर सल्लागार समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. पॅन सिटी, एबीडी अंतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीबाबत सल्लागारांमार्फत सादरीकरण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सचिव चित्रा पवार, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहमुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, टेक्निकल एक्सपर्ट डॉ. प्रताप रावळ, युवक प्रतिनिधी अमित तलाठी, विद्यार्थी प्रतिनिधी दिपक पवार, सिटीझन फोरमचे तुषार शिंदे उपस्थित होते.

स्मार्ट सारथी अ‍ॅपच्या माध्यमातून १ लाख ८५ हजार नागरिकांपर्यंत पोहोचता आले आहे. तसेच, विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे कॅम्पनींग सुरु आहे. मर्चंट मोडयुल अ‍ॅपद्वारे छोट्या व्यापाNयांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. म्युनिसीपल ई – क्लासचे ८० टक्के काम झाले आहे. डोअर टू डोअर सर्व्हे सुरु आहे. कंट्रोल अ‍ॅण्ड कमांड सेंटरचे काम प्रगतीपथावर आहे. एबीडी प्रकल्पांतर्गंत रस्त्यांचे ८५ टक्के काम मार्गी लागले आहे. स्मार्ट बस स्टॉप उभारले जात आहेत. स्मार्ट पार्कींग व्यवस्था, सिनिअर सिटीझन प्लाझा, योगा पार्कची कामे देखील प्रगतीपथावर आहेत. ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यात आली आहे. वायफाय बसविण्यात आले आहे. पोल उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे. सिटी सव्र्हेलन्स अंतर्गत शहरात नेमून दिलेल्या जागेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. स्मार्ट ट्रॅफिकचे कॅमेरे बसविले असून व्हीएमडी, कि ओक्स, स्मार्ट पर्यावरण मशीन, स्मार्ट वॉटर मीटर, स्मार्ट सेव्हरेज, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट आदी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पाची कामे वेगाने सुरु आहेत. तसेच ऑप्टीकल फायबर केबल आणि विविध स्मार्ट एलिमेंटमधून भविष्यात स्मार्ट सिटीला उत्पन्न मिळण्यासाठी निविदा प्रक्रिया सद्यस्थितीत राबविली जात असल्याची माहिती सल्लागार प्रतिनिधींनी दिली.