२ ऑगस्ट २०२५ : ६ मिनिटासाठी जग अंधारात बुडणार, १०० वर्ष असे सूर्यग्रहण दिसणार नाही

0
13

दि . २५ ( पीसीबी ) – पुढील महिन्यात विलक्षण अशी खगोलीय घटना पहायला मिळणार आहे. भरदुपारी अख्ख जग अंधारात बुडणार आहे. हा दिवस २ ऑगस्टचा असून या दिवशीचे सूर्यग्रहण पुन्हा १०० वर्ष दिसणार नाही.

२ ऑगस्ट २०२५ रोजी अत्यंत दुर्मिळ सूर्यग्रहण दिसणार आहे. दुपार नंतर आकाशात काळा अंधार राहील. जगाच्या वेगवेगळ्या खंडात राहणाऱ्या कोट्यवधी लोकांना ते सहज दिसेल. ग्रहणाचा एकूण कालावधी ६ मिनिटे २३ सेकंद असेल. दिवसाचा उजेड अंधारात जाईल, जो पुढील १०० वर्ष पुन्हा दिसणार नाही.
 
बहुतेक सूर्यग्रहणे ३ मिनिटा पेक्षा कमी काळ टिकतात, परंतु हे ग्रहण जगातील बऱ्याच भागांना दुप्पट काळ अंधारात झाकून ठेवेल. याची तीन प्रमुख कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे, पृथ्वी सूर्या पासून सर्वात दूर असेल ज्याला एफिलियन म्हणतात, ज्यामुळे सूर्य लहान दिसेल. दुसरं म्हणजे, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल, ज्यामुळे तो मोठा दिसेल. तिसरे म्हणजे, चंद्राची सावली विषुववृत्तातून जाईल, या वाटेवर सावली मंद गतीने वाढते.

हे सूर्यग्रहण २ ऑगस्ट २०२५ रोजी अटलांटिक महासागरातून सुरू होणार आहे. त्याचा मार्ग जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून अरबी द्वीपकल्पात जाईल आणि हिंदी महासागरात संपेल. त्याच बरोबर त्याची छाया सौदी अरेबियातील जेद्दाह आणि मक्के मधूनही जाणार आहे. याशिवाय येमेन आणि सोमालियाच्या काही भागात ग्रहणाच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी ते गायब होईल.

२०२५ च्या सूर्यग्रहण संदर्भात अनेक कार्यक्रम केले जात आहेत. यामध्ये प्राचीन कर्णक मंदिरातून ग्रहणाचे थेट प्रक्षेपण, तरुणांना प्रेरणा देण्यासाठी स्पेन मधील कॅडिझ येथे विज्ञान कार्यशाळा, लोकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी सौदी अरेबियात तयार करण्यात येत असलेल्या पर्यटन पॅकेजेसचा समावेश आहे.

यात एक गोष्ट ही सर्वात खास आहे ती म्हणजे, ग्रहणाचा एकूण कालावधी ६ मिनिटे २३ सेकंद असेल. दिवसाचा उजेड अंधारात जाईल, जो पुढील १०० वर्षा पर्यंत पुन्हा दिसणार नाही.