पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा १२ मे रोजी दुपारी भर रहदारीच्या ठिकाणी कोयत्याने वार करून आणि पिस्तुलातून गोळ्या घालून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणी आवारे यांच्या मातु:श्री सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असतानाच पोलिसांनी अवघ्या २४ तासात ४ आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
रघू धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे अशी अटक केलेल्यांची नावे असल्याचे समजते.
किशोर आवारे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांची भेट घेण्यासाठी १२ एप्रिल रोजी दुपारी नगरपरिषद कार्यालयात आले होते. भेट झाल्यानंतर ते खाली आले असता तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौकात तेथे दबा धरून बसलेल्या चौघांनी त्यांच्यावर हल्ला हल्ला केला. दोघांनी आवारे यांच्यावर कोयत्याने वार केले तर दोघांनी पिस्तुलातून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आवारे रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना हल्लेखोर काही काळ तेथेच थांबले होते. जखमी आवारे यांना सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले










































