२३ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व काव्यलेखन स्पर्धा उत्साहात संपन्न

0
487

भोसरी, दि.१९ (पीसीबी)- भोसरी येथे नुकताच २३ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व २३ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण आणि विविध पुरस्कार वितरण सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ समाजसेवक,अभियंता वसंत टाकळे(रत्नागिरी) यांच्या शुभहस्ते झाले.वृक्षपूजन करुन झाडाला पाणी घालुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने पर्यावरण संदेश देत उदघाटन सोहळा संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ कवी,साहित्यिक व शिक्षणतज्ञ उदय सर्पे(सिंधुदुर्ग),नक्षञाचं देणं काव्यमंच राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे(कवी वादळकार),सुप्रसिदध उद्योजक विजयशेठ फुगे,उद्योजक योगेश आमले,प्रा.शंकर घोरपडे,कविवर्या सौ अलका नाईक(मुंबई),युवा उद्योजक अमर फुगे,प्रा.दिलीप गोरे,गणेश डबडे,प्रा.डाॅ.राजेंद्र झुंजारराव,रामदास घुंगटकर,साईराजे सोनवणे,रामचंद्र पंडित इ.मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी उदय सर्पे म्हणाले की,”कवींनी आपल्या कवितेची साधना करावी.शब्दांचा आविष्कार प्रभावी मांडून प्रतिभा फुलवंत ठेवावी.हक्काचे व्यासपीठासाठी कवींनी नक्षञाचं देणं काव्यमंच परिवाराशी जोडावे.कवींनी सुंदर जग असल्याने सांगण्याचे काम केलेले आहे.आजच्या काळातील आधुनिक संत कवी आहेत.”

यावेळी समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कविरत्न पुरस्कार कवी रामचंद्र पंडित(सातारा) यांना प्रदान करण्यात आला.तसेच यावेळी १६वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक-व्यासपीठ(नाशिक),द्वितीय क्रमांक-मोडीदर्पण (मुंबई),तृतीय क्रमांक-शब्दाई(पुणे) यांना यश संपादन केल्याबद्दल गौरविण्यात आले.नक्षञ गौरव पुरस्कार ही यावेळी पुढील मान्यवरांना देण्यात आला.त्यात कवयिञी सौ.वृषाली टाकळे (रत्नागिरी),कवी यशवंत घोडे(जुन्नर),कविवर्या प्रा.शितल कांडलकर(नागपूर),कवी मोहन अप्पा घुले (भोसरी),कवी यवनाश्व गेडकर(चंद्रपुर),कविवर्या सौ.पुष्पलता कोळी(जळगाव),कवी प्रा.डाॅ.सत्येंद्र राऊत(उस्मानाबाद),कवी डाॅ.लक्ष्मण हेंबाडे(सोलापुर),कविवर्या सौ.छाया ब्रम्हवंशी(गोंदिया),कविवर्या प्रा.अरुणा डांगोरे(नागपुर),कविवर्य ज्ञानेश्वर काजळे(जुन्नर),कवी मंदार सांबारी(मालवण),कविवर्या सौ.भारती तितरे(गडचिरोली),कविवर्य प्रा.दिलीप गोरे(चाकण) इ.ना सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ,सन्मापञ मान्यवरांच्या शुभहस्ते सर्वांना गौरविण्यात आले.

हा उपक्रम भारताच्या स्वातंञ्यांच्या अमृत महोत्सव वर्षांनिमित्त व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२५ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्तिक प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले.आभारप्रदर्षण रामदास हिंगे यांनी मानले.

यावेळी २३ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेला यावर्षी ३७५ कवितांतून पुढील कवींनी यश संपादन केले.त्यात प्रथम क्रमांक कविवर्या सौ.संध्या ठाकूर(अलिबाग)-श्रावणी-“येता श्रावण श्रावण,झाडे वेली हिरवळ,पाना फुलांचा सुगंध,आसमंती दरवळ”.द्रितीय क्रमांक-कविवर्य डाॅ.राजेंद्र झुंजारराव (पुणे)-श्रावणसरी-“कधी ऊन,कधी पाऊस धारा,खेळ आगळा सदैव चाले.झुळझुळ पाणी अवीट गाणी,जनि मनाशी सृष्टी बोले.क्षणभर येऊन इथेच राहुन,मैफलीत जणू हरी दंगला”.तृतीय क्रमांक-कविवर्या सौ.वृषाली टाकळे-(रत्नागिरी)-निसर्ग-“सूर्य उगवला प्रभात झाली,गुलाल पूर्व दिशेकडे,पीत कोवळे ऊन पसरे,चमकाती डोंगर दरी कडे”.उत्तेनार्थ क्रमांक-१-कविवर्य भाऊसाहेब आढाव-(चिंचवड)-श्रावण-
“चालता श्रावणात खेळ हा ऊन पावसाचा,तो मी रानात बसून पाहिला होता.”.उत्तेनार्थ-२-कविवर्या निर्मला जीवने-(नागपुर)-“पहाट उगवली,सोनेरी सूर्य किरणांनी,गोड नजरेनी,पुलकित केले वसुंधरेनी. “,उत्तेनार्थ-३-कविवर्य रामदास अवचर-(अहमदनगर)-श्रावण -“उन्हाच झालं सोनं,धार रुपेरी बरसे घन,गर्द हिरवं पांघरुण,आला आला गं श्रावण.” यांनी यश संपादन केले.
कार्यक्रमाच्या संयोजनात मोहन कुदळे,पियुष काळे,प्रमोद डोंगरदिवे,गणेश डबडे,रामदास हिंगे,सौ.प्रीती सोनवणे,अप्पा घुले,यशवंत घोडे,सौ.डाॅ.अलका नाईक,सौ.दिव्या भोसले,यशवंत गायकवाड,सौ.अनिता बिराजदार इ.पुढाकार घेतला .राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफलमध्ये ७५ कविंनी कविता सादर करुन काव्यमैफल रंगविली.या मैफलमध्ये रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सातारा,पुणे ,यवतमाळ,गोंदिया,चंद्रपूर,नागपूर,उस्मानाबाद,गडचिरोली,सोलापुर,जळगाव,नाशिक,मुंबई,ठाणे, मालवण,चाकण,जुन्नर,खेड, चिंचवड,काञज,कणकवली, चिखली,भोसरी,आळे,पिंपरी, वडगाव शेरी,शिवाजीनगर,इ.भागातील अनेक कवींनी सहभाग घेतला.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.