२०० आमदार निवडूण आणले नाहीत, तर शेती करायला जाईल; सगळ्या घडामोडींमागचे खरे कलाकार देवेंद्र फडणवीस हेच

0
335

मुंबई, दि. ४ (पीसीबी) “मी माझ्याकडचे 50 आमदार निवडून आणेलच. पण मी आणि फडणवीस दोघे मिळून 165 नाही तर 200 आमदार निवडून आणू,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. जर का २०० आमदार निवडूण आणले नाहीत तर गावाकडे जाऊन शेती करेल, असा निर्धार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

विधानसभेतील आपल्या अभिनंदनपर ठरावाला उत्तर देताना ते म्हणाले, “भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, असं म्हणतात. पण, एवढ्या जणांना EDच्या नोटिसा पाठवल्या. पण कुणाला टाकलं का जेलमध्ये? नाही ना? कारण त्यांना ही लढाई प्रेमाने जिंकायची होती,” असंही मुख्यमंत्री म्हणाले. देवेंद्र फडणवीसच सर्वांत मोठे कलाकार, असंही ते म्हणाले.

शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, पण माघार नाही, असंही शिंदेंनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “ज्यावेळी आम्ही विधानभवनातून निघालो त्याच्या आदल्या दिवशी मी डिस्टर्ब होतो. मला जी वागणूक मिळाली त्याचे हे आमदार साक्षीदार आहेत. एकाही आमदाराने हे मिशन सुरू झालं तेव्हा विचारलं नाही कुठे चाललो? कधी येणार? सुनिल प्रभूंनाही माहिती आहे माझं कसं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला.

“मला अनेकांचे फोन आले. पण मी ठरवलं होतं. शहीद झालो तरी मागे फिरायचे नाही. ही छोटी मोठी घटना नाही. हे एका दिवसांत झालेली नाही. हे खूप आधीपासून सुरू झालं.
“एकीकडे चर्चेला माणसं पाठवायची आणि दुसरीकडे पुतळे जाळायला लावायचे. घरावर दगडफेक करायला सांगायची. अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगडफेक करणारा अजून पैदा झाला नाही. दगड मारणारे हात राहणार नाहीत.”
“मी 30 ते 35 वर्षं या एकनाथ शिंदेनं जीवाचं रान केलंय. रक्ताचं पाणी केलंय. मी कधीही पदाची लालसा केली नाही. अन्याय होतो तेव्हा मी शांत बसत नाही,” असंही शिंदे म्हणाले.माझा मुलगा श्रीकांत डॉक्टर झाला पण बाप म्हणून मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी संघटनेला वेळा दिला. शिवसेनेला वेळ दिला, असंही ते म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे – मी अनेकदा देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये राजीनामा दिला होता. तुम्ही म्हणालात एमएसआरडीसीचं खातं का दिलं? खातं देण्याचं काम यांचं नव्हतं. पण देवेंद्र फडणवीसांनी मला समृद्धी महामार्गाची जबाबदारी दिली.एकदा मंत्रालयात बोलताना अजितदादांना मी विचारलं होतं. दादांनी सांगितले, तुमच्या नावाला आमच्याकडून विरोध नव्हता.

आम्ही कालही शिवसैनिक, आजही शिवसैनिक आणि उद्याही शिवसैनिकच राहणार आहोत.
माझ्या खात्याच्याही अनेक बैठका अजितदादा घेत होते. पण त्यांना मी कधीच रोखलं नाही. कारण काम करत होता तो माणूस. माझ्या खात्यात अनेकजण हस्तक्षेप करत होते.हे सरकार पेट्रोलवरचा वॅट कमी करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेणार. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्हाला करायचा आहे. त्यासाठी विरोधी पक्षानेही सहकार्य करावं.