१८ व १९ नोव्हेंबर २०२३ रोजी मोशीत पार पडणार “इंद्रायणी साहित्य संमेलन”

0
241

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – मोशी येथील इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी इंद्रायणी साहित्य संमेलन होणार आहे. या दोन दिवसांत भरगच्च साहित्य मेळाव्याची माहिती इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदिप तापकीर ,समन्वयक अरुण बोऱ्हाडे, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१८ नोव्हेंबर २०२३ –
सायंकाळी ४.०० वा. : ग्रंथदिंडी – श्री नागेश्वर मंदिर ते जय गणेश बॅंक्वेट हॉल (पद्मश्री ना. धों. महानोर साहित्यनगरी) या दरम्यान काढण्यात येणाऱ्या ग्रंथदिंडीचे पूजन जेजुरीच्या मार्तंड देवस्थानचे विश्वस्त पांडुरंग थोरवे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते होईल.

सत्र पहिले : सायंकाळी ५.३० ते ७.३०

ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी खासदार डॉ अमोल कोल्हे,
शासनाच्या मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, आमदार महेश लांडगे, साहित्यिक डॉ सागर देशपांडे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप भा. तापकीर, समन्वयक अरुण बोऱ्हाडे स्वागताध्यक्ष गणेश सस्ते आदी उपस्थित राहणार आहे.
यावेळी कै. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील अग्रलेखांचे प्रदर्शनाचे उदघाटन,
खासदार डॉ. कोल्हे यांच्या हस्ते होईल.

इतिहास संशोधक संदीप भा. तापकीर लिखित रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : (कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले) या पुस्तकाचे प्रकाशन साहित्यिक डॉ. सागर देशपांडे यांच्या हस्ते होईल. यावेळी साहित्यिक दादा गावडे यांना प्रज्ञावंत पुरस्कार तर ॲड पांडुरंग थोरवे यांना विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

सत्र दुसरे : ७.३० ते ८.३०
अक्षय शिंपी व नेहा कुलकर्णी हे दास्तानगोई हा कलाविष्कार कार्यक्रम सादर करतील. अत्यंत आगळावेगळा ही कथा आहे.

सत्र तिसरे : रात्री ८.३० ते १०.०० यावेळी राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली
निमंत्रितांचे कविसंमेलन होईल.

दि १९ नोव्हेंबर २०२३ रोजी

सत्र चौथे : सकाळी ९.३० ते ११.००

व्याख्याते संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे यांचे
“संतत्व आणि साहित्य” या विषयावर व्याख्यान होईल तर ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास जैद हे अध्यक्षस्थानी असेल.

सत्र पाचवे : सकाळी ११.०० ते १.००

“स्त्रियांचे साहित्यातील योगदान” या विषयावरील परिसंवादामध्ये डॉ. संगीता बर्वे, इंदुमती जोंधळे, डॉ. अपर्णा महाजन, डॉ. लता पाडेकर
समन्वयक डॉ. सीमा काळभोर या सहभागी होणार आहे.

सत्र सहावे : दुपारी २.०० ते ३.००
संमेलनाध्यक्ष सोपान खुडे यांची
मुलाखत संदीप भानुदास तापकीर हे घेणार आहे.

दुपारी ३.०० ते ३.१०

संदिप तापकीर लिखीत “मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले” या पुस्तकाचे प्रकाशन
श्रीमंत रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते
विश्वकर्मा प्रकाशनचे सीइओ विशाल सोनी, माजी सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्या उपस्थितीत होईल.

सत्र सातवे : दुपारी ३.१० ते ५.००
“शिवराज्याभिषेकाचे महत्त्व” विषयावरील चर्चासत्रात श्रीमंत रघुजीराजे आंग्रे (इतिहास अभ्यासक व सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज), इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे
दिग्विजय जेधे (इतिहास अभ्यासक व कान्होजीराजे जेधे यांचे वंशज) हे सहभागी होणार आहे.

सांगता
सायं. ५.०० ते ७.३०
भूमिपुत्र पुरस्कार वितरण आणि समारोपप्रसंगी सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील, लोकमतचे संपादक संजय आवटे,माजी आमदार विलास लांडे, शिवचरित्र अभ्यासक अनिल पवार,
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे हे उपस्थित राहणार आहे.

भूमिपुत्र पुरस्कारप्राप्तीचे नावे पुढीलप्रमाणे

१) विकास कंद, ( सांस्कृतिक देहू)
२) ज्ञानेश्वरी अभ्यासक रामदास जैद, (चिंबळी)

३) अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुहास कांबळे, (मोशी)

५) इतिहासकार जितेंद्र माळी, (दिघी)

५) उद्योजक मोहन भोसले, चऱ्होली

६) स्वकामचे अध्यक्ष सुनील तापकीर (स्वकाम ) आळंदी
७) गडकोट अभ्यासक निलेश गावडे, चिंचवड

८) संस्कृती संशोधक नजिम शेख, आळंदी

९) ह.भ.प. राजेश बोराटे(मोशी)

१०) कराटे प्रशिक्षक गोरखनाथ मोरे (चिखली)

विशेष पुरस्कार :
सीए संदीप आसवले
(डुडूळगाव),सविता खराडे, पिंपरी (कष्टकरी महिला संघटन)

या पत्रकार परिषदेस समन्वयक अरुण बोऱ्हाडे, प्रा परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर,रामभाऊ सासवडे, प्रा राजेश सस्ते,माजी सरपंच हरिभाऊ सस्ते,हिरामण सस्ते,निखिल बोऱ्हाडे, वंदना आल्हाट, अलंकार हिंगे, दामोदर वहिले आदी उपस्थित होते.