१८० दिवसात १९४ कार्यक्रम

0
2
  • शत्रुघ्न काटे यांच्या सहामाही कामकाजाचा विक्रम..!
    पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर शत्रुघ्न काटे यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाचे तसेच प्रदेशाकडून आलेले आणि सार्वजनिक स्वरूपाचे मिळून तब्बल १९४ कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याचा विक्रम केला आहे.

१६ मे रोजी आमदार व प्रदेश भाजपचे निरीक्षक सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते अध्यक्ष निवडीचे पत्र श्री.काटे यांना देण्यात आले. उद्या (१६ नोव्हेंबर)पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेतल्याच्या घटनेला सहा महिने पूर्ण होत आहेत. ज्येष्ठ नगरसेवक असलेल्या श्री.काटे यांनी शहराध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर त्यांचा पहिला सत्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा कार्यालयात भार्गव सदन येथे पार पडला. तर दुसरा सत्कार स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेतर्फे झाल्यानंतर संघटनात्मक कामकाजात त्यांनी स्वतःला झोकून दिले. कार्यकर्त्यांचे संघटन, बांधणी, जनसेवा आणि पक्षनिष्ठा या चार सूत्रांवर काम करण्यास काटे यांनी प्रारंभ केला. आपल्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी निवडताना त्यांनी शहर पातळीवर काम करू इच्छिणाऱ्या तीनशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या व त्यामधून आपल्या टीमची बांधणी केली. अशा प्रकारच्या या वैशिष्ट्यपूर्ण निवड प्रक्रियेची पक्ष पातळीवर राज्य स्तरावर नोंद घेण्यात आली.
मागील सहा महिन्यातील प्रमुख कामांमध्ये सर्वाधिक यशस्वी झालेला संपूर्ण शहरभर पडसाद उमटलेला कार्यक्रम म्हणजे भारतीय सैन्य दलाला वंदन करण्यासाठी शहर भाजपने आयोजित केलेली तिरंगा पदयात्रा होय. भाजपचे मित्र पक्ष व त्यांचे कार्यकर्ते देखील यामध्ये सहभागी झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी स्मारक स्वच्छता अभियान तसेच चौंडी येथे महिलांचा विशेष भेट दौरा हा कार्यक्रमही महत्वपूर्ण म्हणून नोंदला गेला. आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत कार्यशाळा, पश्चिम महाराष्ट्र विभागातील सर्व नवनियुक्त मंडल अध्यक्षांची कार्यशाळा, आणीबाणीतील लढवय्यांचा गौरव, संकल्प सिद्धी ते चौपाल सभा, पंतप्रधान मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कारकीर्दी निमित्त विविध उपक्रमांचा धडाका,समरसता रक्षाबंधन उपक्रमांतर्गत १ लाख ४५ हजार राख्या संकलन अभियान,ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव, स्वातंत्र्यसैनिक स्मारक स्वच्छता अभियान, राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता उपक्रम, पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियान, आत्मनिर्भर भारत अभियान, जीएसटी अभियान आदी प्रमुख पक्षीय कामकाज संघटनेच्या माध्यमातून त्यांनी यशस्वी करून दाखवले.
शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांचे प्रश्न भाजपच्या चारही आमदारांशी समन्वय साधून अधिवेशनात मांडण्यासाठी पुढाकार घेणे,पक्षाचे मेळावे, अधिवेशन, मंडल कामकाजाचे उपक्रम, याचबरोबर गणेशोत्सव, दहीहंडी, दसरा, दिवाळी या सार्वजनिक सण व उत्सवाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची प्रतिमा व प्रतिष्ठा उंचावण्यासाठी सक्रिय सहभाग त्यांनी घेतला.चोवीस तास कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यांना वेळ देणे,या सारख्या कामांमुळे सहामाही काळातच त्यांनी घेतलेली झेप महत्वपूर्ण ठरली गेली.