१६ आमदारांना लागू पडेल तोच निर्णय उरलेल्या २३ आमदारांसाठी

0
220

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून त्याची उत्सुकता महाराष्ट्राबरोबरच अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. या दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी या प्रकारणत १६ आमदारांना लागू पडेल तोच निर्णय उरलेल्या २३ आमदारांसाठी लागू पडेल असे विधान केलं आहे.

निकालाच्या पार्श्वभूमिवर दिल्लीत माध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले की, सुप्रीम कोर्टात दाखल केलेलया याचिकांचा आज निकाल आहे. आमच्या बाजूने कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी, देवदत्त कामत यांनी आपली बाजू मांडली आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा घटनेच्या अनुच्छेद १० मध्ये कसा बसतो ते सर्वोच्च न्यायालयात सांगीतलं आहे.

जे अध्यक्ष आहेत ते या १६ आमदारांच्या मातानंतर आमदार झाले आहेत. हे जे १६ आमदार अपात्रतेच्या छायेत आहेत, अशांची मते घेऊन ते अध्यक्ष झाले आहेत. म्हणून हे पेटीशन त्या अध्याक्षांकडे न पाठवता सुप्रीम कोर्टाने ते ऐकावं अशी मागणी आम्ही केली होती. त्यामुळे या निर्णायाची उत्सुकता आम्हाला आहे, असे परब म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, १६ अमदाकरांची अपात्रतेचा निर्णय त्यावेळचे उपाध्यक्ष तत्कालीन अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी घेतला आहे. ज्याला हे आव्हान दिलं गेलं आहे.आमच्या दोन याचिका आहेत. पहिली १६ अमदारांची आणि दुसरी २३ आमदारांची. ज्या वेळी १६ आमदारांचा निकाल लागेल तोच २३ आमदारांसाठी लागू होईल. अध्यक्षांकडे याचिका आधीच करण्यात आली आहे. १६ आमदारांचा निर्णय झाला की पुढील प्रक्रिया लगेच सुरू होईल असेही परब यावेळी म्हणाले.