१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस…

0
619

नवी दिल्ली, दि. १४ जुलै (पीसीबी) – उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगा अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली.

विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. या नोटिसीत दोन आठवड्यात लिखित उत्तर सादर करा अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आल्या आहेत.