१५ लाखांची लाच घेताना ईडीचाच अधिकारी रंगेहात सापडला…! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

0
207

राजस्थान,दि.०२(पीसीबी) – सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. ईडीचा अधिकारी एका प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी आणि इतर सुविधा देण्यासाठी पीडीत व्यक्तीकडून 17 लाख रुपयांची मागणी करत होता. त्यातले 15 लाख रुपये देत असताना ईडी अधिकाऱ्यासह दोघांना एसीबीने अटक केली.

राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ईडीमध्ये कार्यरत असलेला अधिकारी नवलकिशोर मीना आणि सहकारी बाबूलाल मीना यांना अटक केलीय. दोघेही 15 लाख रुपयांची लाच स्वीकारत होते. यानंतर अधिकाऱ्याच्या अनेक ठिकाणांवर एसीबीने छापे टाकले आहेत. एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिलीय.

मणिपूरमध्ये एका चिट फंड कंपनीच्या प्रकरणी सेटलमेंट करण्यासह इतर सुविधा पुरवण्याच्या नावावर ईडी अधिकाऱ्याने 17 लाखांची मागणी केली होती. शेवटी तडजोड करत 15 लाख रुपये देण्याची तयारी पीडित व्यक्तीने केली होती. ईडी अधिकाऱ्यासाठी काम करणाऱ्या सहकाऱ्यालाही एसीबीने अटक केली. अलवरमध्ये यासाठी सापळा रचण्यात आला होता. हे प्रकरण मोठं असल्याने एसीबीचे अधिकारी अलवरला पोहोचले आहेत.