१५ मे नंतर एकाही मंत्र्याला महाराष्ट्र मध्ये फिरू देणार नाही त्यांना काळे झेंडे दाखवू.

0
261

पिंपरी ,दि. ७ (पीसीबी) -: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आता मराठा क्रांती मोर्चा अधिक आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चा तर्फे आज पिंपरी चिंचवड शहरात मराठा आरक्षण एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. : या परिषदेमध्ये मराठा समजाच्या आरक्षण मागणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले आहेत. मराठा क्रांती मोर्चा ने राज्य सरकारला फक्त आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. मराठा आरक्षणा संदर्भात सरकारने महत्त्वाचा निर्णय घ्यावा, गरज पडल्यास केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करावी, अन्यथा 15 मे पासून प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्याच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा गोंधळ घालो आंदोलन करणार, त्यानंतरही राज्य सरकारने मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर एक जून पासून मुख्यमंत्र्याच्या दालनासमोर मराठा क्रांती मोर्चा आमरण उपोषण आंदोलन करणार.

असा इशारा आज मराठा क्रांती मोर्चा ने मराठा आरक्षण एल्गार परिषदेतून दिला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायदेशीर रित्या टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्या, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नौकर भरती करू नका, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजीराजांचे स्मारकांची कामकाज लवकर पुर्ण करा, अशा काही महत्त्वपूर्ण मागण्या मराठी क्रांती मोर्चा ने आज मराठा आरक्षण एल्गार परिषदेच्या माध्यमातून केल्या आहेत.