१४ मार्चला सरकार कोसळणार याचा अंदाज आल्याने योजनांची खैरात – अजित पवार

0
402

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – न्यायालयातील १४ तारखेचा निकाल विरोधात जाणार आणि सरकार पडणार याची जाणीव झाल्याने अर्थसंकल्पात योजनांची खैरात केलेली दिसते, असा घणाघात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

कसबा आणि शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा झटका बसल्याने त्यांना अंदाज आला असावा, असेही पवार म्हणाले. शब्दांचे फुलोरे असलेला हा निव्वळ चुनावी जुमला आहे, अशी टीका पवार यांनी केली.