१३ व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलेल्या मुलीवर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही

0
501

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला आहे. नवनीत राणांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. तू ठाकरे असशील तर मीही राणा आहे, असं आव्हान त्यांनी दिलं होतं. त्यानंतर किशोरी पेडणेकरांनी राणांवर प्रतिक्रिया दिली आहे.

किशोरी पेडणेकर आज माध्यमांशी बोलत होत्या. त्यावेळी बोलताना त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंसह अनेकांवर टीका केली. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी नवनीत राणांविषयी प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांना मधूनच तोडत पेडणेकर म्हणाल्या की, मी काहीही बोलणार नाही. १३ व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलेल्या मुलीवर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही.

नवनीत राणांनी चार पाच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. जळगावमधल्या एका सभेत बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, ठाकरेंना वाटलं होतं की जेलमधून बाहेर आल्यावर मी घाबरुन बसेन. मी जेलमध्ये १२-१२ तास हनुमान चालिसा पठण करत होते. मी म्हणाले होते की माझ्या भक्तीमध्ये थोडी जरी शक्ती असेल तरी मी उद्धव ठाकरेंना त्यांची खरी जागा दाखवेन. आज तुम्ही पाहू शकता, ज्यांच्या जीवावर उद्धव ठाकरे एवढा गर्व करत होते, आज त्यांच्या घरात त्यांच्या बाजूने उभा राहणारा कोणी कार्यकर्ता शिल्लक नाही.