होय मी नाराज…., छगन भुजबळ यांची कबुली; मोठे विधान करत म्हणाले….

0
45

मुंबई, दि. 16 (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा रविवारपासून सुरु होती. अखेर सोमवारी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. ते म्हणाले, होय मी नाराज आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय? मंत्रिपद किती वेळा आले आणि किती वेळा गेले भुजबळ कधी संपले नाही? असे वक्तव्य करत त्यांनी पक्षातील बड्या नेत्यांना आपली ताकद दाखवण्याचे संकेत दिले.

छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरु झाली. त्यानंतर भुजबळ मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात आले नाही. सोमवारी सकाळी भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे निकटवर्तीय असलेले प्रमोद हिंदूराव यांना पक्षाने त्यांना भेटण्यासाठी पाठवले. त्या भेटीनंतर भुजबळ यांची नाराजी दूर झाली नाही. सोमवारी दुपारी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी वैतागून आपण नाराज असल्याचे मान्य केले. होय, मी नाराज आहे, असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बॅनर ठिकठिकाणी लागले आहे. त्या बॅनरवर छगन भुजबळ यांचा फोटो नाही? त्यावर ते म्हणाले, पक्षात बॅनरवर फोटो नाही, कारण बॅनरवर जागे नसेल, असे उत्तर भुजबळ यांनी दिले. पक्षातील सर्वोच्च नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिले नाही, त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, मला मंत्रिमंडळात का घेतले गेले नाही, हे त्यांना विचारा. पक्षाच्या नेत्यांना विचारा. त्याचे उत्तर मी कसे देऊ.

अजित पवार यांच्याशी काही संवाद झाला का? त्यावर भुजबळ म्हणाले, मी कालपासून अजित पवार यांच्याशी बोललो नाही. मला ते गरजेचे वाटले नाही. मी पुढे काय करायचे त्याचा निर्णय अजून घेतला नाही. त्यासंदर्भात मी माझ्या लोकांशी बोलणार आहे. समता परिषदेच्या लोकांशी बोलणार नाही. त्यानंतर निर्णय घेईल, असे ते म्हणाले.