होणाऱ्या नवऱ्याच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

0
628

तळेगाव , दि. २५ (पीसीबी) – प्रियकर व होणाऱ्या नवऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा सारा प्रकार 16 डिसेंबर रोजी घडली असून आरोपी हा मागील अडीच ते तीन महिन्यांपासून पीडीतेलै त्रास देत होता.

अनिषा रणजीत खंडागळे (वय 21) असे मयत मुलीचे नाव असून मुलीच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अभिजीत अनिल राठोड (रा. मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला आरोपीने प्रेमाचे आमिष दाखवून लग्नाची स्वप्ने दाखवली. पुढे त्याने तरुणीवर संशय घेण्यास सुरुवात केली. तसेच तरुणीला बोलणे टाळणे, नंबर ब्लॉक करणे, शिवीगाळ करणे असा मानसीक त्रास दिला. पुढे आरोपी ने लग्नास टाळाटाळ केली. याच नैराश्यातून तरुणीने राहत्या घरी ओढणीने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.