हॉस्पिटल मध्ये घुसून महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकत सोनसाखळी हिसकावली

0
234

हिंजवडी, दि. ६ (पीसीबी) – हॉस्पीटलमधील वर्किंग रूम मध्ये घुसत दोघांनी महिलेच्या डोळ्यात मिरची पुड टाकत गल्यातील सोनसाकली हिसकावली. हा प्रकार शनिवारी (दि.4) सायंकाळी कासारसाई येथील राक्षे डेंटल क्लिनिक येथे घडला.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.5) फिर्याद दिली असून दोन अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या हॉस्पिटलच्या वर्कींग रुममध्ये असताना दोन अनोळखी इसम खोलीत आले व त्यांनी फिर्यादीचे तोंड जोरात दाबून डोळ्यात मिरची पूड टाकली. दरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी तोडून घेतली व पर्समधील रोख रक्कम असा एकूण 25 हजार 300 रुपयांचा एवज चोरून नेला आहे. मात्र हॉस्पीटलमध्ये घुसून चोरी झाल्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. हिंजवडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.