हॉस्पिटलमध्ये मेडिकल व पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याच्या बहाण्याने पाच जणांची लाखोंची फसवणूक

0
54

देहूरोड, दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) -हॉस्पिटलमध्ये मेडिकल आणि पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याच्या बहाण्याने पाच जणांकडून पैसे घेत त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना नोव्हेंबर 2022 ते 10 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडली. याप्रकरणी हॉस्पिटल चालक दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनीष नागेश डोईफोडे आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी विजय दत्तू महाडिक (वय 34, रा. नवी सांगवी. मूळ रा. अहमदनगर) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील शुभश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे चालक आरोपी यांनी फिर्यादी विजय महाडिक सतीश महाजन यांना सांगितले की हे हॉस्पिटल छत्तीस बीडचे आहे हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देत आहोत मुख्य रस्त्यापासून जवळ असल्याने खूप बिझनेस होणार आहे फिर्यादीचा विश्वास संपादन करून हॉस्पिटलमध्ये मेडिकल टाकण्यासाठी अकरा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.

त्याचबरोबर शुभम बाबुराव हरणे यांच्याकडून मेडिकल शॉप टाकण्यासाठी अकरा लाख रुपये, रोहन संतोष निंबळे यांच्याकडून पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी सहा लाख रुपये, प्रवीण रोशन नवले यांच्याकडून पॅथॉलॉजी टाकण्यासाठी दहा लाख रुपये, सिद्धार्थ संजय बरळ यांच्याकडून मेडिकल शॉप टाकण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन त्यांची देखील फसवणूक करण्यात आली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.