हॉस्टेल मधून अवघ्या 15 मिनिटात वेगवेगळ्या रूम मधून फोन चोरीला

0
638

वाकड, दि. २४ जुलै (पीसीबी) – होस्टेलमधील वेगवेगळ्या रूम मधून अवघ्या 15 मिनिटात चार फोन एकाच वेळी चोरीला गेले आहेत. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.23)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद एकनाथ जायभाय ( वय26 वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील लाईफ पॉईंट होस्टेल मधील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर रूम मधून फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांचे असे एकूण चार फोन अवघ्या पंधरा मिनिटात चोरीला गेले आहेत. चोरी झाल्याचे कळतच फिर्यादी यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे पोलिसाचा पुढील तपास करत आहेत.