हॉटेल समोरून दुचाकी चोरीला

0
244

मोरवाडी, दि. २४ (पीसीबी) – हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली. ही घटना मंगळवारी (दि. २१) रात्री साडेनऊ ते सव्वा दहा वाजताच्या सुमारास मोरवाडी येथे घडली.

अब्दुल महम्मद खालीद चौधरी (वय २८, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १४/एडब्ल्यू ६६१४) मोरवाडी येथील एका हॉटेल समोर पार्क केली. पाऊण तासात त्यांची दुचाकी चोरीला गेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.