हॉटेल व्यावसायिकाची सोनसाखळी हिसकावली

0
434

रावेत, दि. १० (पीसीबी) – हॉटेलच्या समोर गाडीची साफसफाई करत असलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या गळ्यातील चार तोळ्यांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 8) दुपारी रावेत येथील हॉटेल विसावा येथे घडली.

विजय बाळू चव्हाण (वय 33, रा. रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांच्या हॉटेलसमोर पार्किंगमध्ये ते गुरुवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास गाडीची साफसफाई करत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची एक लाख 20 हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.