हॉटेल मध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री

0
197
  • हॉटेल मालक, चालकावर गुन्हा दाखल

वाकड, दि. ५ (पीसीबी) – हॉटेल मध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्या प्रकरणी हॉटेल मालक आणि चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. ३) रात्री कस्पटेवस्ती, वाकड मधील हॉटेल मॅगी ट्री येथे करण्यात आली.

हॉटेल चालक पिंटू धर्मचरण विश्वास (वय ३६, रा. वाकड), हॉटेल मालक अजित दिलावर इनामदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार स्वप्नील खेतले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक इनामदार याने पिंटू याला बेकायदेशीरपणे दारू आणून दिली. ती दारू पिंटू हा ओळखीच्या लोकांना विकत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी कारवाई करत एक लाख चार हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.