हॉटेल मधील सुरक्षा रक्षकांना जमावाने जबरदस्तीने काढले बाहेर

0
439

माळवाडी, दि. १७ (पीसीबी) – हॉटेल मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या कामगारांना दहा जणांच्या जमावाने जबरदस्तीने बाहेर काढले. माळवाडी येथील ऐश्वर्या हॉटेल येथे घडली.

साजन शिवाजी मुरकुटे (वय २८, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय माळी, सिद्धार्थ माळी, कालिदास शेलार, सुरेश गायकवाड, रोहिदास भसे (सर्व रा. माळवाडी, ता. मावळ) आणि इतर चार ते पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुरकुटे आणि त्यांच्या सोबत ऐश्वर्या हॉटेल येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या कामगारांना आरोपींनी बेकायदा जमाव जमवून हॉटेलच्या बाहेर काढले. तसेच फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हॉटेलच्या आवारात येण्यास प्रतिबंध केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.