आळंदी,दि.२३(पीसीबी) – हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कामगारांनी हॉटेलच्या गल्ल्यातून दीड लाख रुपये चोरले. ही घटना शुक्रवारी (डी. 22) पहाटे चार वाजता मेदनकरवाडी येथील हॉटेल न्यू प्रसाद येथे उघडकीस आली.
गोविंद कोंदू रैकवार (रा. आळंदी फाटा, मूळ रा. मध्य प्रदेश), रोहित रमेश ठाकूर (रा. आळंदी फाटा, मूळ रा. मध्य प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी तेजू मानसिंग राठोड (वय 32, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आळंदी फाटा, मेदनकरवाडी येथे न्यू प्रसाद नावाने हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आरोपी गोविंद आणि रोहित हे काम करत होते. गुरुवारी रात्री नऊ ते शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या कालावधीत कामगारांनी हॉटेलच्या गल्ल्यातील एक लाख 50 हजार रुपये चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.