हॉटेलला रेटिंग देण्याच्या टास्कद्वारे तरुणाची अकरा लाखांची फसवणूक

0
274

चिंचवड, दि.२७ (पीसीबी)- हॉटेलला रेटिंग देण्याचे टास्क देऊन त्यावर अधिक परतावा देण्याचे आम्हीच दाखवत तरुणाची दहा लाख 95 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 10 ते 17 मे या कालावधीत केशवनगर चिंचवड येथे घडला.

गणेश मुकुंद अमृतकर (वय 28, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानुसार टेलिग्राम चॅनल धारक आणि अन्य अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी आरोपींनी टेलिग्राम चैनल द्वारे फिर्यादी यांच्याशी संवाद साधला. एका वेबसाईट द्वारे कमिशन देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना हॉटेलला रेटिंग देण्याचे टास्क देण्यात आले. हॉटेलला रेटिंग देण्याचे टास्क देऊन त्यावर अधिक परतावा देण्याचे आमिष आरोपींनी फिर्यादी यांना दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेत त्यांची एकूण दहा लाख 95 हजार 82 रुपयांची फसवणूक करण्यात आली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.