हॉटेलमध्ये बालकामगार ठेवल्या प्रकरणी हॉटेल चालकावर गुहा

0
199

दि 29 मे (पीसीबी ) – हॉटेल मध्ये कामाला बालकामगार ठेवल्या प्रकरणी चाकण येथील एका हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 27) एबी फेमस बिर्याणी हाऊस, चाकण येथे करण्यात आली.

दिलशाद मिराज अली (रा. चाकण, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार आरती पडवळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलशाद अली याचे चाकण येथे एबी फेमस बिर्याणी हाऊस नावाचे हॉटेल आहे. त्या हॉटेल मध्ये त्याने दोन लहान मुलांना कामाला ठेवले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हॉटेल चालक अली याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

14 वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. याप्रकरणी बाल किशोर कामगार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.