हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या घरात दीड लाखांची चोरी

0
212

वाकड, दि. २९ (पीसीबी) – घरातील सर्वजण हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी गेले असताना चोरट्याने घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री पावणे नऊ ते साडेदहा वाजताच्या कालावधीत द्वारका साई सोसायटी, रहाटणी येथे ही घटना घडली.

चैतन्य साखरचंद बधान (वय 29, रा. द्वारका साई सोसायटी, गोडांबे कॉर्नर, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय सोमवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घराचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातून 60 हजारांची 16 ग्रॅम वजनाची सोन्याची वेढणी, 89 हजारांची रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.