हॉटेलमधील कामगारांना लुटण्याचा प्रयत्न..

0
306

चिंचवड, दि. २ (पीसीबी) -हॉटेलमध्ये काम करणा-या दोन कामगारांना अडवून त्यांना लुटण्याचा प्रयत्न झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३१) रात्री साडेअकरा वाजता चिंचवडगावातील महाराष्ट्र हॉटेल समोर घडली.मनोहर भागवत बोतरे (वय ४९, रा. येलवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १७ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चिंचवड येथे हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेल मध्ये अधीर कृष्णा बिसवास, सुमन इंद्रबहादूर थापा हे दोन कामगार काम करतात. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास दोन्ही कामगार हॉटेल समोर असताना एका १७ वर्षीय मुलाने त्यांना अडवले. त्यांच्याकडे पैशांची मागणी करून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर दोन्ही कामगारांचे खिसे जबरदस्तीने तपासून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.