हे तर निवडणुका पुढे ढकण्याचे तंत्र – संजय राऊत

0
216

मुंबई, दि. १ (पीसीबी) – संजय राऊत म्हणाले की, देश तर एकच आहे, याबद्दल कुणाच्या मनात शंका आहे का? एक देश, एक निवडणूक ठीक आहे, पण त्याआधी निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात. मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज (शुक्रवारी) दुसरा दिवस आहे. यादम्यान मोदी सरकारकडून एक देश एक निवडणूकीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान एक देश, एक निवडणूक हे षडयंत्र असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.

फेअर इलेक्शन ही आमची घोषणा आहे. एक देश, एक निवडणूक नव्हे आम्हाला निष्पक्ष निवडणूका हव्या आहेत. देशात निष्पक्ष निवडणूका होत नाहीयेत.

निष्पक्ष निवडणुकीची आमची मागणी पुढे ढकलण्यासाठी त्यांनी (केंद्र सरकार) वन नेशन, वन इलेक्शन घेऊन आले आहे च. मला वाटतं की निवडणूका पुढे ढकलण्यासाठीचे हे एक षडयंत्र आहे, यांना निवडणूकाच घ्यायच्या नाहीयेत असेही संजय राऊत म्हणाले.

‘इंडिया’ला घाबरलेले लोक दररोज नवीन काहीतरी घेऊन येत आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी हे सुरू आहे, असेही संजय राऊत म्हणाले. यांनी केंद्र सरकार अधिवेशनाचे विशेष अधिवेशन बोलवलं आहे. याची काय गरज आहे. जेव्हा सत्र असते तेव्हा पंतप्रधान सभागृहात येत नाहीत. हा कोणता अमृतकाळ आहे. महाराष्ट्रासहित अनेक राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातले खासदार तेथे येऊ नयेत म्हणून हे करण्यात आलं आहे. हा छळ आणि कपट आहे, असेही संजय राऊत म्हणाले.