हुक्का विक्री प्रकरणी हिंजवडी मधील ठेका हॉटेलवर कारवाई

0
119

हिंजवडी, दि. 9 (प्रतिनिधी)
पिंपरी, दि.९ (पीसीबी) – हिंजवडी मधील ठेका हॉटेलवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का विक्री केली जात असल्याबाबत रविवारी (दि. 7) रात्री 11 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

हॉटेल मॅनेजर अरविंदसिंग चमेलसिंग (वय 27, रा. हिंजवडी), हॉटेल मालक वैभव प्रल्हाद वारडे (वय 35, रा. आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार कैलास केंगले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन तयार न करता ग्राहकांना जेवण्यासाठी व हुक्का पिण्यासाठी एकत्र बसवले. ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत 24 हजार 198 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.