हुक्का पार्लरवर रावेत पोलिसांची कारवाई

0
690

रावेत, दि. ६ (पीसीबी) – रावेत येथे टॉप 87 हॉटेलच्या तोडलेल्या मोकळ्या जागेत अवैधरित्या हुक्का पार्लर चालवल्या प्रकरणी रावेत पोलिसांनी कारवाई केली.

सचिन विठ्ठल वाळुंज (वय 32, रा. आकुर्डी), दीपक भोंडवे (रा. रावेत) यांच्या आदेशाने मॅनेजर रितेश ओमप्रकाश शर्मा (वय 27, रा. रावेत) हे हॉटेल चालवत होता. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश गुळीग यांनी रावेत चौकीत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन आणि दीपक हे टॉप 87 या हॉटेलचे मालक आहे. त्यांनी हॉटेलच्या तोडलेल्या मोकळ्या जागेत 20 ते 25 लोकांना बसवून हुक्का पार्लर चालवले. यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यात हुक्क्याचे पॉट, हुक्का पिण्याचे साहित्य असा एकूण आठ हजार 420 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.