हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; विवाहितेने संपवले जीवन

0
356

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहित महिलेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सन 2020 ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.

रेणुका विकास मोरे (वय 22) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी रेणुका यांचे वडील सुरेश फडतरे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती विकास महावेद मोरे, सासू, सासरे महादेव मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी रेणुका हिचा विकास याच्यासोबत विवाह झाला. लग्न झाल्यानंतर सात महिन्यापासून आरोपींनी संगनमत करून माहेरहून हुंद्यातील राहिलेली रक्कम 20 हजार रुपये आणि दागिने आणण्यासाठी दबाव आणला. त्याची वेळोवेळी मागणी करून विवाहितेस मारहाण करत शिवीगाळ करून तिचा छळ केला. 3 फेब्रुवारी रोजी रेणुका तिच्या सासरच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.