हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

0
210

दिघी, दि. ७ (पीसीबी) – हुंड्यात भरपूर पैसे व सोने दिले नाही म्हणून विवाहितेला क्रुर वागणूक दिल्या प्रकरणी पती व सासू – सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 डिसेंबर 2021 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत अहमदनगर येथे घडला.

याप्रकरणी 26 वर्षीय पिडीतेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती अक्षय दिलीप (वय 27), सासू व सासरे जयश्री दिलीप लाळगे (वय 46) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी पीडितेला लग्नात भरपूर पैसा दिला नाही सोने दिले नाही, व्यवसायासाठी पैसा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ कले. तसेच पतीला दुसऱ्या मुलीशी ल्गन करायचे आहे म्हणून विवाहितेला क्रुर वागणूक दिली. घरात बंद करून ठेवले, सासऱ्यांनीही गैरवर्तणूक केली. यावरून दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.