हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
82

हिंजवडी, दि. ०१ (पीसीबी) : घर बांधण्यासाठी तुझया बापाकडून पैसे आण, असे म्हणत विवाहितेचा छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. ही घटना बोडकेवाडी माण येथे घडली.

अंजली गोवर्धन जाधव (वय 24, रा. बोडकेवाडी माण, ता. मुळशी, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा पती गोवर्धन गोपीचंद जाधव, (वय 30), सासरे गोपीचंद जाधव (वय 55), गोरखनाथ राठोड, सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत अंजली यांचे वडिल देवीदास काशिराम राठोड (वय 46 रा. व्हा, ता. मानोरा, जि. वाशिम) यांनी सोमवारी (दि. 30) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांची मुलगी अंजली यांना माहेराहून घर बांधण्यासाठी पैसे आणावेत यासाठी तिचा शाररीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.