हिमाचल प्रदेशपाठोपाठ आता कर्नाटकची सत्ताही भाजपच्या हातातून गेली

0
286

बंगळुरु : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. सहा महिन्यांत सलग दुसऱ्यांदा भाजपला मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशपाठोपाठ आता कर्नाटकची सत्ताही भाजपच्या हातातून गेली आहे. त्याचवेळी देशभरात राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या काँग्रेसला मोठा विजय मिळाला.

ताजे बलाबल :
पार्टी सीट
काँग्रेस 130
भाजपा 66
जेडीएस 22
अन्य 06

आधी हिमाचल प्रदेश आणि आता कर्नाटकच्या निवडणुका लागोपाठच्या निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेससाठी संजीवनी ठरू शकतात. या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की कर्नाटकात काँग्रेसचा विजय कसा झाला? काँग्रेसच्या या विजयाचे राजकीय महत्त्व काय?

राजकीय विश्लेषक प्रा. अजयकुमार सिंग म्हणाले, ‘कर्नाटकमध्ये 2004, 2008 आणि पुन्हा 2018 मध्ये कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. 2013 मध्ये काँग्रेसने 122 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. राज्यात मुख्य लढत गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसने अनेक वेळा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले आहे, तर भाजपला कधीही पूर्ण बहुमत मिळालेले नाही. यावेळीही असेच काहीसे घडले.