हिजाब विरोधात इराणमध्ये जाळपोळ

0
322

इराण, दि. २२ (पीसीबी) – महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराण आता आगीत होरपळत आहे. इराणमध्ये हिजाबविरोधातील निदर्शनांना आता हिंसक वळण लागले आहे. हिजाब जाळण्यासाठी पेटवलेली आग आता इराणमधील अनेक शहरे जाळून टाकू शकते. हिजाबच्या विरोधात निषेध आणि आक्रमकता जास्त प्रमाणात पसरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी स्त्रिया हिजाब जाळत होत्या आणि आता लोक गोंधळ करून सरकारी मालमत्ता जाळण्याच्या प्रयत्न करत आहेत. इराणमधील अनेक शहरांमध्ये वाढता हिंसाचार पाहता लोकांनी अफवा टाळून हिंसक होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करावी लागली आहे.

इराणमध्ये कमी-अधिक प्रमाणात निदर्शने होत आहेत. एके ठिकाणी आंदोलक बाहेर आले मोठ्या प्रमाणावर त्यांची गर्दी झाली. आंदोलकांनी सुरक्षारक्षकांना खूप मारहाण केली. त्यामध्ये दिवांदरेह शहरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या कुर्दिश प्रदेशाचा हा भाग आहे, जिथे हिजाबच्या विरोधात सर्वाधिक निदर्शने होत आहेत.इराणमध्ये अनेक आंदोलकांना अटक केल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनीही महसा अमिनी यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला असून मृत्यूची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, इराणच्या विरोधकांचा हा सुनियोजित कारस्थान असल्याचेही अध्यक्ष रायसी सांगत आहेत. हिजाब न घातल्याने पोलिसांनी कुटुंबासह तेहरानला भेट देण्यासाठी आलेल्या मेहसा अमिनीला ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

दुसरीकडे, इराणचे पोलीस मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप फेटाळत आहेत. महसा अमिनी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतील जनता इराणच्या शूर महिलांच्या पाठीशी उभी आहे. यूएनजीएमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन बोलत होते आणि त्यांनी इराणच्या मुद्द्याचाही उल्लेख केला होता. अमेरिकेतील जनता इराणच्या शूर महिलांच्या पाठीशी उभी असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यापूर्वी भारतातूनही इराणी महिलांच्या समर्थनार्थ आवाज उठवण्यात आला होता.