हिंदू ठरवणारअमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष…

0
331

विदेश,दि.१५(पीसीबी) – अमेरिकेच्या सत्तेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या कॅपिटल हिल येथे बुधवारी पहिल्यांदाच हिंदू-अमेरिकन शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू-अमेरिकन समुदायाला पाठिंबा देण्यासाठी अनेक अमेरिकन खासदारांनी देखील सम्मेलनात सहभाग घेतला होता. यावेळी रिपब्लिकन खासदार मॅककॉर्मिक यांनी मोठ वक्तव्य केल आहे. अमेरिकेच्या विकासात हिंदू समुदायाचे मोठे योगदान आहे. या समुदायात इतकी ताकद आहे की ते अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष कोण हे ठरवू शकतात, असे मॅककॉर्मिक म्हणाले.

अमेरिकेत काल (बुधवार) झालेल्या शिखर परिषदेत अनेक अमेरिकन खासदार आणि राजकीय वकिलांचा गट सामील झाला होता. या शिखराची सुरुवात वैदिक मंत्रोच्चाराने झाली. अमेरिकन फोर हिंदूज ने आयोजित केलेल्या या शिखर संमेलनात देशभरातील हिंदू समुदायाचे नेते सहभागी झाले होते. त्याचबरोबर इतर २० संघटनांनीही या परिषदेला पाठिंबा दिला. Americans4Hindus चे अध्यक्ष आणि हिंदू-अमेरिकन समिटचे मुख्य आयोजक रोमेस जापरा म्हणाले, “आमची हिंदू मूल्ये पूर्णपणे अमेरिकन संवैधानिक मूल्यांशी सुसंगत आहेत. अमेरिकन नागरिकही गीता वाचतात.”

रिपब्लिकन काँग्रेसचे रिच मॅककॉर्मिक म्हणाले, “मला या स्थलांतरित लोकसंख्येबद्दल खूप आदर आहे. त्यांनी अमेरिकेत बरीच भर घातली आहे. सर्व काही उत्कृष्ट आहे. मी हे पुन्हा पुन्हा सांगतो की या समुदायाने जागरूकता दाखवल्यास त्यांच्याकडे किती शक्ती आहे हे त्यांना कळेल, मग ते अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष देखील ठरवू शकतात.