हिंदू जनजागृती समिती आणि सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने किल्ले सिंह गडावर स्वच्छता मोहीमेचे यशस्वी आयोजन

0
267

पुणे, दि. २ (पीसीबी) – छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गडकोट हा आपला ऐतिहासिक वारसा असून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडकोटांच्या संवर्धनासाठी मोहीम राबवण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने किल्ले सिंहगडावर 1 एप्रिल या दिवशी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी मधील शिवप्रेमी सहभागी झाले होते.

गडावरील कोंढाणेश्र्वर मंदिर, देव टाक, अमृतेश्वर मंदिर तसेच कल्याण दरवाजा तटबंदी, हत्ती तलाव नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक या आजूबाजूचा परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, दारूच्या बाटल्या, विहिरीतील कचरा, तटबंदी भिंतीवरील गवत काढणे इत्यादी स्वच्छता केली. ‘हिंदू जनजागृती समितीचे’ कृष्णा पाटील आणि कार्यकर्ते यांनी मोहिमेचे नेतृत्व केले होते.

स्वच्छता मोहिमेला गडावरील स्वप्नील भोसले, प्रथमेश धूमाळ, प्रतीक सरवदे, यांनी सहकार्य केले. ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ चे विद्यार्थी प्रांजली भांडे, सिद्धांत खैरनार, शिवराज पाटील यांच्या बरोबरच सर्व उत्साही कार्यकर्त्यांनी गड किल्ले स्वच्छतेचे महत्व आलेल्या पर्यटकांना सांगत मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली. यावेळी गडावरील उपस्थित पर्यटक तेथील व्यवसायिक शिवप्रेमी दुर्गप्रेमींनी यांनी मोहिमेचे कौतुक केले.काही जण उपक्रमात सहभागीही झाले होते.