हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी हडपसर येथे 1 जानेवारी 2023 या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती सभा ! – श्री.पराग गोखले,हिंदू जनजागृती समिती

0
265

हडपसर, दि. ३० (पीसीबी) – भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल,असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय-आयोग नाही. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना धार्मिक शिक्षण देणार्‍या शाळांना सरकारी अनुदान, तर हिंदूंना भगवतगीतेसह धार्मिक शिक्षण देण्यावरच आक्षेप आहे !

देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’, भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 1 जानेवारी 2023 या दिवशी सायंकाळी 6 वाजता मारुतीराव काळे शाळेचे मैदान,काळे पडळ, हडपसर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पराग गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या सभेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री सुनील घनवट, अधिवक्ता निलेश सांगोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत, तसेच या सभेत सनातन संस्थेच्या संत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती पराग गोखले यांनी दिली.
या सभेच्या ठिकाणी राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या संदर्भात तसेच क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक;यांसह हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तसेच हिंदु जागृती करणार्‍या, हिंदूंना धर्मशिक्षण देणार्‍या विविध ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

आतापर्यंत सभेसाठी ५० हून अधिक गावांमध्ये व्यापक प्रसार करण्यात आला असून विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या 150 हून अधिक बैठका घेण्यात आल्या आहेत. 4500 पेक्षा अधिक जणांनी या बैठकांचा लाभ घेतला. सामाजिक संकेतस्थळ, हस्तपत्रके, होर्डिंग, फलकलेखन अशा विविध माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. या सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित रहावे, तसेच सभेत सहभागी होण्यासाठी 8983335517 या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.
सभेच्या निमित्ताने जनमानसात जागृती व्हावी या उद्देशाने समितीच्या वतीने 31 डिसेंबर या दिवशी सायंकाळी 4.30 वाजता भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. फेरीचा मार्ग पुढील प्रमाणे:

फेरी प्रारंभ – पुरोहित स्वीट्स – ससाणेनगर – काळेबोराटे नगर रस्ता – जनसेवा बँक कॉलनी – तुकाई टेकडी चौक – कै. मारुतराव काळे शाळेचे मैदान येथे समारोप होईल.

यावेळी सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव,अखिल भारतीय वारकरी मंडळ सदस्य आणि चिंतामणी प्रासादिक दिंडीचे खजिनदार ह.भ.प. दत्तात्रय तुकाराम चोरघे, भाजप पुणे कसबा मतदारसंघाच्या सरचिटणीस अ‍‍ॅड राणी सोनावणे, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच केडगावचे अध्यक्ष डॉ. निलेश लोणकर हेही उपस्थित होते, यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले.