हिंदु युवक-युवतींनो, व्हॅलेंटाईन डेसारख्या पाश्‍चात्त्य विकृतीला बळी पडू नका !

0
156

‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात विविध शाळा महाविद्यालयांत निवेदने सादर !

पुणे, दि. १२ (पीसीबी) – स्वैराचाराचे समर्थन करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षडयंत्र म्हणजे व्हॅलेंटाईन डे ! 14 फेब्रुवारीला येणारा व्हॅलेंटाईन डे जगभर साजरा करण्यात येतोे. पाश्‍चात्त्यांच्या या डेचे तरुण-तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर अंधानुकरण केले जाते. पहिला रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी बियर डे, प्रॉमिस डे, हग गे, किस डे आणि आठवा व्हॅलेंटाईन डेे असा संपूर्ण आठवडा यामुळे वाया जात आहे.

व्हॅलेंटाईन डेेमुळे होणार्‍या दुष्परिणामांमुळे तरुण पिढीचे अधःपतन होत असून, ही देशापुढील एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे. या ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी अन् चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि तत्सम संघटना मागील 11 वर्षांहून अधिक काळ ही प्रबोधन चळवळ ठिकठिकाणी राबवित आहे. यावेळीही पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले. या मागणीला विविध शाळा महाविद्यालयांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये समाजातून अधिकाधिक जिज्ञासू सहभागी होत आहेत आणि जागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही मोहीम 14 फेब्रुवारी पर्यंत राबवण्यात येणार आहे.

मोहिमेला मिळत असलेला प्रतिसाद !
1) ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात 15 हून अधिक शाळा-महाविद्यालयामधे देण्यात आले. अजूनही निवेदन देणे चालू आहे.
2) विविध शाळांमधून आणि महाविद्यालयातून प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
3) व्याख्यानाच्या माध्यमातून ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करून भारतीय संस्कृतीनुसार आचरणाचे महत्व लक्ष्यात घेऊन अशी कृती करण्याचे आश्वसन विद्यार्थी आणि जिज्ञासूंनी दिले.
4) संपूर्ण जिल्ह्यात फलक लेखनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
5) गुरुकुल माध्यमिक विद्यालय, पारगाव (सा.मा.) तालुका दौंड येथील रयत शिक्षण संस्थेच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ आणि कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी करण्यात आलेल्या मार्गदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. व्याख्यान झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःहुन येऊन त्यांच्या मनातील शंकांचे जिज्ञासेने निरसन करून घेतले. तसेच व्हॅलेंटाईन डेसारख्या पाश्‍चात्त्य विकृतीला बळी न पडता भारतीय संस्कृतीनुसार आचरण करण्याचे ध्येय घेतले आहे.