मुंबई, दि. १४ (पीसीबी) – हिंदवी परिवार या संस्थेच्या ३०० शिवभक्तांनी तामिळनाडू राज्यात चेन्नई परिसरात जावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिंजी किल्यावर जावून दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी केली. हिंदवी परिवाराचे संस्थापक शिवचरित्र व्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांच्या नेतृत्वाखाली जिंजी किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दहा मान्यवरांना सह्याद्री भूषण हा पुरस्कार पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.त्यात नवशक्ति व फ्री प्रेस जर्नलचे समूह राजकीय संपादक राजा माने, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आवाड, चित्रकार नितीन खिलारे आदींचा समावेश होता.
राष्ट्र प्रथम वंदे मातरम ह्या ब्रीद वाक्याने चालणारी हिंदवी परिवार ही संघटना, युवकांनी छत्रपती शिवरायांच्या फक्त भोगोलिक नव्हे तर छत्रपती शिवरायांच्या आचरणाचा मार्गावर चाललं पाहिजे ह्यासाठीच गेली दोन दशकांपासून दरवर्षी गडकोट पदभ्रमंती मोहिमांचे आयोजन हिंदवी परिवार करत असते. यंदाच्या वर्षी देखील दिनांक 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर ह्या 4 दिवसात
छत्रपती शिवरायांची दक्षिण दिग्विजय मोहिमेचा थरार महाराष्ट्रातील शिवभक्तांना अनुभवता यावा ह्यासाठी हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा शिव व्याख्याते डॉ शिवरत्न शेटे यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू येथील स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी किल्ला तसेच साजीरा-गोजीरा किल्ला, वेल्लोर किल्ला, बृहदेश्वर मंदिर तंजावर पॅलेस,सरस्वती महाल आदी ठिकाणी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण पदभ्रमंती मोहिमेचे नियोजन मोहीम सरनौबत डॉ संभाजी भोसले आणि कार्याध्यक्ष अमोल मोहिते यांनी पाडले.
मोहिमेच्या पहिल्या दिवशी गोजीरा किल्ला व वेल्लोर भुईकोट किल्ला पाहिला तर
वेल्लोर किल्ला जिंकण्यासाठी शिवछत्रपतींनी समोरील डोंगरावर बांधलेले जुळे किल्ले साजिरा-गोजिरा ,यापैकी साजिऱ्यावर उपलब्ध असलेल्या दुर्मिळ शिवछत्रपतींच्या दगडीस्तंभावरील शिल्पाला मोहिमवीरांनी जंगली वेलींच्या दाट जाळ्यातून मुक्त करून सर्वांना दर्शन घडविले ,हे मोहिमेचे वैशिष्ट्ये ठरले . दुसऱ्या दिवशी साजिरा किल्ला सर केला महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम तेथील तामिळ मराठी बांधवांच्या उपस्थिती मोहिमेसाठी आलेल्या शिवभक्तांकडून सादर करण्यात आले
तिसऱ्या दिवशी सर्व शिवभक्तांनी जिंजी येथील कृष्णगिरी आणि राजगिरी किल्ला सर केला
ह्याप्रसंगी हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवव्यख्याते डॉ शिवरत्न शेटे यांनी आपल्या व्याख्यानातून जिंजी किल्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात केल्या गेलेल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा इतिहास उपस्थितांना ह्याप्रसंगी सांगितला.
मोहिमेच्या शेवटचा म्हणजे चौथ्या दिवशी तंजवार येथील बृहदेश्वर मंदिर, मराठा पॅलेस, सरस्वती महल, आदी ठिकाण तंजावर गादीचे छत्रपती व्यंकोजीराजे यांचे 14 वे वंशज आबाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीत
तंजावरच्या मराठा दरबारातही तंजावरचे सरफोजीराजे भोसले यांच्या इतिहासाचे संक्षिप्त कथन डॉ.शेटे यांनी केले.
ह्या मोहिमेत तंजावर गादीचे छत्रपती व्यंकोजीराजे यांचे 14 वे वंशज आबाजी राजे भोसले व राणीसाहेबांचा विशेष मानपत्र देऊन जिंजी पायथ्याला गौरव करण्यात आला.
ह्यासंपूर्ण पदभ्रमती मोहमेत भूषण बापट, हितेश डफ, दिलीप मेसरे, विठ्ठल इंगळे, संतोष शेटे, धारेश्वर तोडकरी, नितीन सुकरे,डॉ. स्वरूप पाटील वसंत झावरे, शंभू लेंगरे, अर्चना शिंदे, महेश शिंदे, डॉ अभिषेक गांधी, संभाजी जाधव, गौतम गांधी, लता धामणे, अमृत काटकर, पद्मिनी गावंडे आदींनी परिश्रम घेतले
चौकट
जिंजी किल्ल्याच्या पायथ्याशी राज्यस्तरीय पुरस्काराचा सह्याद्री सन्मान सोहळा
खालील मान्यवरांना पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
एबीपी माझा चे संपादक मा.श्री राजीव खांडेकर यांना –
सह्याद्री जीवनगौरव
समूह राजकीय संपादक दैनिक नवशक्ती व फ्री प्रेस जर्नल चे राजा माने यांना -सह्याद्री जीवनगौरव
राष्ट्रीय आयुर्वेद गुरू मा.श्री. डॉ. रामदास आव्हाड यांना -सह्याद्री जीवनगौरव
चित्रकार मा.श्री. नितीन खिलारे यांना -सह्याद्रीभूषण
वज्रधारी संपादक दत्तकुमार खंडागळे यांना सह्याद्रीभूषण
वेल्लोर येथील सामाजिक कार्यकर्ते बळवंत जगदाळे यांना सह्याद्रीजीवनगौरव
जिल्हाधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांना सह्याद्री जीवनगौरव
गडकन्या हमीदाखान यांना
सह्याद्रीभ्रमंतीभूषण
डॉ.सौ. नयना बच्चुभाऊ कडू यांना सह्याद्रीभूषण
डॉ.यशवंत राजे भोसले यांना
सह्याद्रीशौर्य
अशा पुरस्काराने आदीं मान्यवरांचा सन्मान जिंजी किल्ल्याच्या पायथ्याशी करण्यात आला.
याप्रसंगी हिंदवी परिवाराचे संस्थापक,तथा शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांनी जिंजींचा संक्षिप्त इतिहास जिंजीवर कथन करताना ,पुरस्कारार्थींना भविष्यात राष्ट्रपतीभवनातही पुरस्कार मिळतील,
परंतु शिवछत्रपतींनी जिंकलेल्या व संभाजीराजियांची हत्या झाल्यानंतर ,
छत्रपती राजाराम महाराजांना आश्रय देऊन..आठ वर्षे हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या जिंजी किल्ल्यावर पुुरस्कारार्थींना पुरस्कार मिळणं सात जन्माची पुण्याई असल्याचे कथन केले.
चौकट
( छत्रपतींच्या नामोल्लेखाच्या फलकाचे जिंजी पायथ्याशी अनावरण)
स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी किल्ल्यावर पुरातत्व खात्याने लावलेल्या बोर्डवर छत्रपती शिवरायांचे आणि छत्रपती राजाराम महाराजांचे उल्लेख नसल्याचे खंत मनात बाळगून हिंदवी परिवाराने त्या किल्ला भेटीस येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांना छत्रपती शिवरायांचे शौर्य कळावे ह्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांचे नामोल्लेख असलेला बोर्ड हिंदवी परिवाराने पोलिस उपायुक्त मा.शेखर देशमुख यांच्या विशेष सहकार्याने ह्या पदभ्रमंती मोहिमेच्या प्रसंगी लावून,एबीपी माझा चे मा.राजीव खांडेकर,पद्मश्री पोपटराव पवार,तंजावरचे श्रीमंत आबाजीराजे भोसले डॉ.नयना कडू,मा राजा माने,डॉ.ओमप्रकाश शेटे,डॉ.रामदास आव्हाड,
पोलिसउपायुक्त शेखर देशमुख ,नितीन खिलारे मान्यवरांच्या उपस्थित त्याचे उदघाटन करण्यात आले.
हिंदवी परिवाराच्या या पदभ्रमंती मोहिमेत,उपायुक्त शेखर देशमुख, तंजावरचे आबाजीराजे भोसले,
पद्मश्री पोपटराव पवार,मा.राजीव खांडेकर,मा.डॉ.ओमप्रकाश शेटे
यांनी सपत्नीक किल्लेभ्रमंती केली हे
या मोहिमेचे वैशिष्ट्ये ठरले.