हिंजवडी येथे हुक्का पार्लरवर कारवाई

0
42

हिंजवडी, दि. 16 (पीसीबी) : हिंजवडी येथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये 1800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 15) दुपारी दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

वैभव प्रल्हाद वारडे (वय 39), मॅनेजर सोहम दीपक कदम (वय 23) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार आकाश हंबर्डे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथे एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केली. या कारवाई मध्ये 1800 रुपये किमतीचे दोन हुक्का पिण्याचे भांडे जप्त करण्यात आले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.