हिंजवडी मध्ये गोमांस पकडले

0
73

हिंजवडी, दि.23(पीसीबी)

हिंजवडी मध्ये 22 किलो गोमांस सदृश मांस वाहतूक करताना आढळून आले. ही घटना रविवारी (दि. 22) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास शिंदे वस्ती मारुंजी येथे उघडकीस आली.

याप्रकरणी अक्षय परशुराम गवारे (वय 28, रा. गवारेवाडी, मान) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद उस्मान घणी शेख रहिमुद्दिन (रा. काळा खडक, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद हा दुचाकीवरून गोमांस सदृश मांस विक्रीसाठी घेऊन जात असताना आढळून आला. त्याच्याकडून 22 किलो वजनाचे पाच हजार 720 रुपये किमतीचे गोमांस सदृश मांस जप्त करण्यात आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.