हिंजवडीत बंगल्यात घुसून बिबट्याने केली कुत्र्याची शिकार, व्हिडीओ व्हायरल

0
288

हिंजवडी, दि. १७ (पीसीबी) : मानव आणि बिबट्या यांच्यांत संघर्ष सुरु असतो. जंगलात खाद्य मिळत नसल्यामुळे बिबटे अनेक ठिकाणीशहराकडे आपला मोर्चा वळवत आहे. आता आयटी सीटी अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील हिंजवडी भागातील फेज थ्रीमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हिंजवाडी फेज थ्री पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरे गावातील शिंदे वस्तीत संभाजी जाधव यांच्या घरात शिरूर पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना भीती वाटत आहे.

बिबट्याचा मागील तीन वर्षांपासून अधिक काळ नेरे, जांबे आणि कासारसाई भागामध्ये खुलेआम वावर आहे. यामुळे भागामधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील स्थानिक नागरिक करत आहे. मात्र वनविभाग सातत्याने स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने बिबट्याची दहशत या भागात अजूनही पाहायला मिळत आहे.
हिंजेवाडीत एक बिबट्या घुसला. त्याने घरात बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. कुत्रा आपला जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होता. परंतु बिबट्यापुढे त्याचे प्रयत्न अपूर्ण पडले. चैनने बांधलेल्या कुत्र्याला बिबट्याने ओढून नेले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना भीती वाटप आहे.

https://www.instagram.com/reel/Cp41fFNN89u/?utm_source=ig_web_button_share_sheet