हिंजवडीत दोन हुक्का पार्लरवर कारवाई

0
26

हिंजवडी, दि. 30 (पीसीबी)
हिंजवडी मधील आकासा हॉटेल आणि एका सोसायटीच्या रुफटॉप लॉंज मध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली.

आकासा हॉटेलचे मॅनेजर राकेश शेट्टी (वय ३६, रा. पिंपळे सौदागर), वेटर युवराज दीपक खडका (वय २२, रा. कोंढवा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अजिंक्य शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी आकासा हॉटेल मध्ये हुक्का पार्लर चालवले. त्यामध्ये कोळशाने पेटलेला झारा हातात घेऊन लाकडी टेबलावर गिऱ्हाईकांना हुक्का पेटवून विक्री केला. हॉटेल मधील लोकांना तसेच हॉटेल मध्ये कोळशाच्या ठिणगीमुळे आग लागेल, अशा प्रकारे आरोपींनी कोळसा वापरला.

दुसरी कारवाई विस्टेरिया फॉर्च्युन सोसायटी येथे रुफटॉप लॉंज मध्ये करण्यात आली. मॅनेजर सुदर्शन दयानंद किणीकर (वय ३०, रा. वाकड), हॉटेल चालक-मालक तुषार भूमकर (रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी हॉटेल मध्ये लोकांना हुक्का पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. हुक्का चालविण्यासाठी लोखंडी शेगडी, कोळसा वापरून ज्वलनशील पदार्थांबाबत निष्काळजीकरून लोकांच्या जीवितास आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.